Sampat Barskar : शहरातील सिग्नल तत्काळ सुरू करा; संपत बारस्कर यांचे आयुक्तांना निवेदन

Sampat Barskar : शहरातील सिग्नल तत्काळ सुरू करा; संपत बारस्कर यांचे आयुक्तांना निवेदन

0
Sampat Barskar : शहरातील सिग्नल तत्काळ सुरू करा; संपत बारस्कर यांचे आयुक्तांना निवेदन
Sampat Barskar : शहरातील सिग्नल तत्काळ सुरू करा; संपत बारस्कर यांचे आयुक्तांना निवेदन

Sampat Barskar : नगर : शहरांमध्ये विविध चौकात बसविण्यात आलेले सिग्नल बंद (Traffic Signal) असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच चौकातील सिग्नल तत्काळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Barskar) यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले

चौका-चौकात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले

अहिल्यानगर शहरांमध्ये विविध चौकात सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे एक दोन चौक वगळता सर्व सिग्नल बंद आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात चौका-चौकात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सवामध्ये सिग्नल बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन लोकांना जीव गमवावा लागला.

नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा

सर्व सिग्नल सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन (Sampat Barskar)

पत्रकार चौक, प्रेमदान चौक, भिस्तबाग चौक, चांदणी चौक, यश पॅलेस चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेट बँक चौक तसेच उपनगरातही अनेक ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक कारणाअभावी सर्वच सिग्नल बंद आहेत. त्यामुळे प्रेमदान चौक, एसबीआय चौक, चांदणी चौक अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. दरम्यान, पत्रकार चौक ते डीएसपी चौक दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ शहरातील बंद असलेले सिग्नल सुरू करावेत. जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल आणि सामान्य नागरिकांचा त्रास कमी होईल. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व सिग्नल सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे.