LCB : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरामध्ये चोरी (Theft) करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. याटोळीने पाथर्डी, लोणी, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर एमआयडीसी, राहुरी, कोपरगाव पोलीस ठाणे हद्दीत १५ चोरीचे गुन्हे (Crime of Theft) केले असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. या टोळीकडून तब्बल ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
जिल्ह्यातील मंदीरांमध्ये घरफोडी केल्याचे समोर
राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव), रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर (रा. इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), एकनाथ नारायण माळी (रा. ममदापुर ता. राहाता हल्ली रा. बिरोबा बन, शेतकरी हॉटेल मागे, शिर्डी), शत्रुघ्न मुरलीधर मोरे (रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा राहुल भाऊसाहेब माळी (रा. बिरोबा बन, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), पांडू बाबासाहेब मोरे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर), (सर्व पसार) यांनी सात ते आठ महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये घरफोडी केल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून चार लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमालहस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
रेकॉर्डवरील सराईत आरोपी (LCB)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील कोरडी येथे शनी मंदिरात चोरी करणारे संशयित आरोपी राहुल भालेराव याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव), हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याचेविरुध्द अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे, घरफोडी, चोरीचे असे एकूण १९ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णू भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली.