Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : अहिल्यानगरमध्ये प्रथमच ‘डिजिटल महाकुंभ’; डिजिटल विश्वातील दिग्गज एकाच व्यासपीठावर

Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : अहिल्यानगरमध्ये प्रथमच 'डिजिटल महाकुंभ'; डिजिटल विश्वातील दिग्गज एकाच व्यासपीठावर

0
Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : अहिल्यानगरमध्ये प्रथमच 'डिजिटल महाकुंभ'; डिजिटल विश्वातील दिग्गज एकाच व्यासपीठावर
Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : अहिल्यानगरमध्ये प्रथमच 'डिजिटल महाकुंभ'; डिजिटल विश्वातील दिग्गज एकाच व्यासपीठावर

क्रिएटिव्हिटी, नेटवर्किंग आणि प्रेरणा थेट डिजिटल सुपरस्टार्सकडून मिळवण्याची सुवर्णसंधी!

Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : नगर : सोशल मीडिया आणि डिजिटल विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांचा प्रवास आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी व त्यातून मार्गदर्शन मिळवण्याचा लाभ अहिल्यानगरकरांना मिळणार आहे. शहराची ओळख बनलेल्या ‘आय लव्ह नगर’ने (I Love Nagar) येत्या ८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ २०२५’ (Ahilyanagar Digital Mahakumbh 2025) या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राजकारण, मनोरंजन, फॅशन आणि मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांतील डिजिटल सुपरस्टार्स (Superstar) एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले

नरेंद्र फिरोदिया यांची संकल्पना

सध्याच्या डिजिटल युगात, प्रत्येकजण सोशल मीडियावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या क्षेत्रात ज्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे, अशा यशस्वी व्यक्तींचा प्रवास आणि अनुभव प्रेरणादायी ठरावा, या हेतूने ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील सोशल मीडिया दिग्गज अहिल्यानगर शहरात येणार आहेत.

नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा

कार्यक्रमाचे तपशील : (Ahilyanagar Digital Mahakumbh 2025)

  • ▪️ दिनांक: ८ नोव्हेंबर २०२५
  • ▪️ वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५
  • ▪️ स्थळ: माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर

या कार्यक्रमात खालील नामवंत वक्ते मार्गदर्शन करतील:

  • ▪️ सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी
  • ▪️ मा. आमदार सत्यजित तांबे
  • ▪️ फायनान्स एज्युकेटर आणि क्रिएटर सी.ए. रचना रानडे
  • ▪️ सुप्रसिद्ध डिजिटल क्रिएटर अथर्व सुदामे
  • ▪️ फॅशन अँड लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर उर्मिला निंबाळकर
  • ▪️ सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमल इंगळे
  • ▪️ बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे

यावेळी फातिमा आयेशा यांचा स्टँड-अप कॉमेडीचा विशेष कार्यक्रम होणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध आर.जे. शोनाली करणार आहेत.

या कार्यक्रमाला ‘बीगॉस इलेक्ट्रिक मोबिलिटी’ यांचे मुख्य प्रायोजकत्व, तर ‘कॅनन’ यांचे सह-प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, ‘लेट्सअप मराठी’ हे डिजिटल पार्टनर असून, ‘सिनेलाईफ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कार्यक्रमात नोंदणी करणाऱ्या उपस्थितांमधून लकी ड्रॉद्वारे एका भाग्यवान विजेत्याला लेटेस्ट ‘ॲपल आयफोन १७’ जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, सर्व नोंदणीकृत उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येतील.

या कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असून, उपस्थितांसाठी गोल्ड आणि सिल्व्हर पास उपलब्ध आहेत. आपली जागा निश्चित करण्यासाठी digitalmahakumbh.ilovenagar.com या संकेतस्थळाला भेट देऊन आजच नोंदणी करण्याचे आवाहन सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित बुरा यांनी केले आहे.