Crime Filed : नगर : अहिल्यानगर शहरासह नेवासा तालुक्यात कत्तलीसाठी चालेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station), नेवासा पोलीस ठाण्यात (Nevasa Police Station) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. याबाबत दोन लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
यांच्यावर गुन्हा दाखल
कोतवाली पोलीस ठाण्यात इरफान फारुक कुरेशी (वय- ३४), शकील बाबासाहेब कुरेशी (वय-३५, दोघे रा. बेपारी मोहल्ला झेंडीगेट, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर नेवासा पोलीस ठाण्यात मुजाहिद अमिर शेख, मोहसिन शब्बीर शेख (दोघे रा. सलाबतपुर ता. नेवासा), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार असा एकूण २ लाख ५ हजार २०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत केला.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
यांच्या पथकाने केली कारवाई (Crime Filed)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहिद शेख, विष्णू भागवत, अतुल लोटके, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, सतीश भवर, चालक भगवान धुळे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.