Schoolgirl injured in leopard attack : संगमनेर : कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) एका चौदा वर्षीय शाळकरी मुलगीवर अचानक हल्ला करून तिला गंभीरित्या जखमी (Schoolgirl injured in leopard attack) केले असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावामध्ये शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या मुलीवरती हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाने (Forest Department) तात्काळ उपयोजना राबवून या भागात धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद केले आहेत.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला अचानक हल्ला
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील प्रगती सखाराम श्रीराम (वय १४) आज (ता.११) सकाळी सात वाजता घरून गावात शाळेत जात होती. ती खेमनर वस्तीजवळ आली असता कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. ही घटना गावातील देवराम खेमनर यांनी पाहिली आणि त्यांनी त्या मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र, बिबट्याने तिच्या मानेला चावा घेतला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. त्या वेळी खेमनर यांनी घटनास्थळी थांबून कपड्याने जखम बांधून घेत रक्तस्त्राव बंद केला आणि तिला तात्काळ लोणी येथील प्रवारा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
लस उपलब्ध नसल्यामुळे उपचारास विलंब (Schoolgirl injured in leopard attack)
मात्र, त्याठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे त्या मुलीला संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश दिले. तसेच जखमी मुलीला आवश्यक ती लस आणि उपचार तातडीने उपलब्ध करून देण्या बाबतच्या सूचना दिल्या.