नगर : हुंडा (Dowry) घेणारे नामर्द असल्याचं स्पष्ट मत मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे (Actor Makarand Anaspure) यांनी व्यक्त केलं. स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते आज अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निंबा फाटा येथे एका सभेत बोलत होते. निंबा फाटा येथे ‘अंदुरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी’च्या वतीने ‘कुणबी स्नेहमिलन सोहळा’ आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या.
नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील अभिनेते म्हणून मकरंद अनासपुरे यांची ओळख आहे. आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आणि नाना पाटेकरांनी एकत्रित ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केलीय. निंबा फाटा येथे आयोजित या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केलं आहे.
अवश्य वाचा: हैद्राबादचं खुराट बोकड आलं अन् काहीतरी बडबड करुन गेलं;संग्राम जगताप यांची असदुद्दीन ओवीसींवर खोचक टीका
देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत (Makarand Anaspure)
देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नसल्याचं यावेळी अनासपुरे म्हणाले. याशिवाय कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावतीवरही त्यांनी परखडपणे भाष्य केलं. जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील, तर कापसाचा भाव आणखीनही कमी कसा? हा सवाल त्यांनी सरकारला केला.
शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का नाही ? (Makarand Anaspure)
शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का नाही? असा सवालही मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कर वसुली करू नये, असं आवाहनही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केलं. चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक यांनीही सध्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन केलं.