Accused Arrested : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

Accused Arrested : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

0
Accused Arrested : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद
Accused Arrested : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

Accused Arrested : नगर : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड (Vandalism of Kalakendra in Jamkhed) करणारे संशयित आरोपी (Accused Arrested) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे असा एकूण सहा लाख ५३ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर   

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

अक्षय किशोर बोरुडे (वय २९, रा. मिरी रोड, तिसगाव, ता.पाथर्डी), शहनवाज अन्वर खान (वय ३०,(रा. इंदीरानगर, तिसगाव, ता पाथर्डी), जयसिंग दादापाटील लोंढे (वय २५ रा. आडगाव, ता.पाथर्डी), अविनाश भास्कर शिंदे (वय २९,रा तिसगाव), गणेश सचिन शिंदे (वय १९, रा तुळजापूर पेठ, तिसगाव), ऋषिकेश यौसेफ गरुड (वय १८, रा तिसगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर ), अनिकेत नितिन कदम (वय २५, रा एमआयडीसी रोड, ता. आष्टी, जि.बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर दीपक यौसेफ गरुड (रा तिसगाव), शिवम भारत आठरे (रा. पारेवाडी, ता. पाथर्डी), किशोर शिवाजी जाधव (रा. तिसगाव), अक्षय राजेंद्र जायभाय (रा. पाथर्डी), रोहीत दिलीप खंदारे (रा तिसगाव), आशिष हरीभाऊ साळवे (रा तिसगाव), संतोष लोंढे (पूर्ण नाव माहित नाही, रा आडगाव, ता.पाथर्डी), अमोल महाडीक (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पारेवाडी), अभी मते (रा. नेवासा), सर्व (पसार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सचिन मधुकर लोखंडे (रा.आष्टी, ता.आष्टी जि. बीड) यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अवश्य वाचा:  “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार 

सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Accused Arrested)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड यथील रेणुका कला केंद्रावर दहशत करून तोडफोड केल्या प्रकरणातील संशयित आरोपी पाथर्डी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.


ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश चंद्रकांत माळी, दीपक घाटकर, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, रोहीत यमुल, भागवान थोरात, सतीश भवर, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, सोनल भागवत, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.