Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषदेच्या मतदार यादीवर ५०० हून अधिक हरकती

Pathardi Municipal Council

0
Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषदेच्या मतदार यादीवर ५०० हून अधिक हरकती
Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषदेच्या मतदार यादीवर ५०० हून अधिक हरकती

Pathardi Municipal Council : पाथर्डी : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेल्या २४७ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादी (Voter List) कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. आयोगाने प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठीची मुदत वाढवून १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत केली आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी नगरपरिषदेच्या (Pathardi Municipal Council) १० प्रभागांसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर 

सुमारे ५०० हून अधिक हरकती व सूचना प्राप्त

नगरपरिषदेच्या कार्यालयात सुमारे ५०० हून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अर्जांमध्ये मतदार नावांतील दुरुस्ती, वगळलेल्या नावांचा समावेश, नव्या मतदारांची नोंद आणि पत्ते दुरुस्ती यासंबंधी मागण्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचा सुधारीत कार्यक्रमात प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर आहे. तर अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित व प्रसिद्धी : ३१ ऑक्टोबर व मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्धी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अवश्य वाचा:  “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार 

अडचणी आल्यास ई-मेलद्वारे संपर्काचे निर्देश (Pathardi Municipal Council)

मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधितांनी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यंत तातडीच्या कारणांसाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे राज्य निवडणूक आयोगाच्या संगणकीकरण कक्षा कडून प्रशासनाला कळविले आहे.पाथर्डी शहरात मतदार यादी प्रसिद्ध होताच नागरिकांनी आपले नाव तपासण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात गर्दी केली आहे. नव्या मतदारांची नोंद, पत्ता बदल, आणि वगळलेल्या नावांची पडताळणी यासाठी नागरिक सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.नगरपरिषद प्रशासनाकडून सर्व अर्जांची छाननी सुरू असून, अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.मतदार यादीचा संपूर्ण सुधारीत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.