Road Robbery : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात रस्ता लूट (Road Robbery) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपींना (Suspected Accused) श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
अनिकेत गोरख उकांडे (वय-२६, रा. अकोळनेर ता. जि. अहिल्यानगर), प्रथमेश शिवनाथ शिंदे (वय- २२,रा. शिवाजी चौक, श्रीगोंदा), विजय शहाजी देशमुख (वय-३०, रा. नळवणे ता. जुन्नर, जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मयुरी आनंदा पाटील (ता. नातोशी ता.पाटण जि.सातारा), सागर भिमराव साळवे (रा.बाबुर्डी बेंद ता.जि. अहिल्यानगर), प्रतीक धावडे (रा. तांदळी दु ता. श्रीगोंदा), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यामध्ये रेल्वे ऍ़क्ट, विनयभंग, गंभीर दुखापत करणे या सारखे गुन्हे दाखल आहेत.
नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर
खात्रीशीर माहिती नुसार कारवाई (Road Robbery)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात रस्ता लूट करणारे संशयित आरोपी हे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.