Mohtadevi : मोहटादेवी ट्रस्ट विश्वस्त निवड प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हा न्यायाधीशांकडे निवेदन

Mohtadevi : मोहटादेवी ट्रस्ट विश्वस्त निवड प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हा न्यायाधीशांकडे निवेदन

0
Mohtadevi : मोहटादेवी ट्रस्ट विश्वस्त निवड प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हा न्यायाधीशांकडे निवेदन
Mohtadevi : मोहटादेवी ट्रस्ट विश्वस्त निवड प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हा न्यायाधीशांकडे निवेदन

Mohtadevi : पाथर्डी : मोहटे (Mohtadevi) (ता.पाथर्डी) येथील श्री जगदंबादेवी (मोहटादेवी) सार्वजनिक न्यासाच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत (Trustee Selection Process) झालेल्या अपारदर्शकता, मनमानी व अन्याय्य अपात्रतेविरोधात ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत निवेदनाद्वारे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या वतीने अहिल्यानगर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात निवड प्रक्रियेत झालेल्या गंभीर त्रुटी, अपात्रतेतील अन्याय्य कारणे, आणि पारदर्शकतेचा अभाव याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

निवेदनात म्हटले आहे की,

अनेक पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केले होते. तरीसुद्धा १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखत यादीत अनेक पात्र अर्जदारांना मनमानी पद्धतीने वगळण्यात आले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपात्र उमेदवारांची यादी बेकायदेशीर असून, काही उमेदवारांना कागदपत्रे साक्षांकित नाहीत, कुटुंब प्रमुखाच्या नावाने उत्पन्न दाखला आहे. रंगीत झेरॉक्स जोडलेली आहे. अशा किरकोळ आणि तांत्रिक कारणांवरून बाद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी ही कारणे हास्यास्पद व हेतुपरस्सर असल्याचा आरोप केला आहे.
कोणत्याही उमेदवाराला अपात्र ठरवण्यापूर्वी त्याला कारण सांगणे, स्पष्टीकरण देण्याची संधी देणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया पूर्णपणे टाळण्यात आली. यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन झाले असून, निवड समितीकडून पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट दिसतो, असे निवेदनात म्हटले आहे.

नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर

निवड प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेचा निषेध (Mohtadevi)

या संदर्भात मोहटे ग्रामपंचायतीने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून विषयावर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांनी एकमुखीपणे ठराव मंजूर करत निवड प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेचा निषेध केला. अपात्रतेची यादी तात्काळ रद्द करावी, सर्व पात्र अर्जदारांना मुलाखतीची संधी द्यावी, संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी. तसेच मुलाखत प्रक्रिया स्थगित ठेवावी किंवा पुढे ढकलावी त्याचप्रमाणे स्वतंत्र न्यायिक चौकशी नेमून अनियमिततेचा तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अ‍ॅड. बाबासाहेब फुंदे, अ‍ॅड. अक्षय दहिफळे, भीमराव पालवे, भाऊसाहेब दहिफळे, महादेव दहिफळे यांसह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, उच्च न्यायालय, लोकायुक्त, मानवाधिकार आयोग, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत.