Tofkhana Police Station : तारकपूर परिसरातून चार संशयित ताब्यात; तोफखाना पोलिसांची कारवाई

Tofkhana Police Station : तारकपूर परिसरातून चार संशयित ताब्यात; तोफखाना पोलिसांची कारवाई

0
Tofkhana Police Station : तारकपूर परिसरातून चार संशयित ताब्यात; तोफखाना पोलिसांची कारवाई
Tofkhana Police Station : तारकपूर परिसरातून चार संशयित ताब्यात; तोफखाना पोलिसांची कारवाई

Tofkhana Police Station : नगर : तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Tofkhana Police Station) गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान तत्परतेने कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित गुन्हा (Crime) करण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांच्या ताब्यातून विविध साधने व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पकडलेल्या चौघांची नावे

आरिफ सत्तार शेख (वय २४, रा. कोठला झोपडपट्टी), फैजान मंजूर सय्यद (वय २३, रा. मुकुंदनगर, दरबार चौक), शेख हुजेर लियाकत (वय २४, रा. मुकुंदनगर, सी.आय.व्ही. कॉलनी) व शेख दस्तगीर अरशफ (वय २०, रा. मुकुंदनगर) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी हद्दीत गस्त वाढवण्याचे आदेश दिले.

अवश्य वाचा : पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

पळण्याचा प्रयत्न करतताना घेतले ताब्यात (Tofkhana Police Station)

त्यानुसार रात्री ८ ते १२ या वेळेत पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, अविनाश बर्डे, भानुदास खेडकर, रोहकले, योगेश चव्हाण, बाळासाहेब भापसे आणि भागवत बांगर हे तारकपूर परिसरात गस्त घालत असताना एका हॉस्पिटलजवळ चिंचेच्या झाडाखाली चार युवक दुचाकीवर संशयास्पद स्थितीत बसलेले दिसले. पोलीस जवळ जात असल्याचे पाहून हे इसम पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, लाल रंगाचा कटर, नायलॉन दोरी, अनेक चाव्यांचा जुडगा असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.