Ahilyanagar Municipal Corporation : महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का?; गिरीश जाधव न्यायालयात जाणार

Ahilyanagar Municipal Corporation

0
Ahilyanagar Municipal Corporation : महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का?; गिरीश जाधव न्यायालयात जाणार
Ahilyanagar Municipal Corporation : महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का?; गिरीश जाधव न्यायालयात जाणार

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिकांची प्रभाग रचना व आरक्षण रचना (Reservation Structure) जाहीर करण्यात आली असताना, अहिल्यानगर महापालिकेने मात्र, मुदत संपूनही प्रभाग रचना जाहीर न केल्याने वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) गटाने केला आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव म्हणाले की,

“महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या उमेदवारांना सोयीस्कर ठरतील अशा पद्धतीने प्रभागांचे फेरबदल करण्याचे काम केले आहे. वॉर्डरचना आणि आरक्षण जाहीर करताना रस्ते, लोक वस्ती, दलित वस्ती, अपार्टमेंट कॉलनी, नदीकाठचा परिसर, यामध्ये विभागणी करू नये, असे असताना आपल्या सोयीच्या मतदारांना एका वार्डात घेण्यासाठी उभ्या पद्धतीने वॉर्डची रचना करण्यात आली. तर झेंडीगेट पासून नालेगावपर्यंत एकच वॉर्ड, ज्या रहिवाशांचा कधीही एकमेकांशी संबंध आला नाही, अशा प्रकारच्या करण्यात आली.

नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर

अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप (Ahilyanagar Municipal Corporation)

दलित वस्तीची तोडफोड करून वेगळ्याच प्रभागांना हा भाग जोडण्यात आला आहे. यामध्ये महामार्ग, उड्डाणपूल, नदीकाठ याची देखील दोन भागात विभागणी झालेली आहे. विद्यमान विरोधी पक्षाच्या उमेदवारांना गैरसोयीचे होईल, अशा प्रकारे भाग करण्यात आले. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून, अधिकाराचा सर्रास गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “प्रभाग रचना ही सर्व पक्षांसाठी समान न्यायाच्या तत्वावर केली गेली पाहिजे. पण सध्याची मनमानी रचना लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारी आहे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.” असेही त्यांनी म्हटले आहे.