Tractor Theft : शेतकऱ्याचा चोरीस गेलेला टॅक्टर व ट्रेलर सोलापूर मधून घेतला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Tractor Theft : शेतकऱ्याचा चोरीस गेलेला टॅक्टर व ट्रेलर सोलापूर मधून घेतला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0

Tractor Theft : नगर : श्रीरामपूर तालुक्यातून ट्रॅक्टर व ट्रेलरची चोरी (Tractor Theft) करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद (Arrested) केले आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे

भागवत निवृत्ती ताके (वय- ३२), समाधान शाहुराव मिसाळ (वय-३७, दोघे रा. जेऊर हैबती, ता.नेवसा), सिध्दांत रमेश डुकरे (वय-२६, रा. चिंचोली फाटा. ता. राहुरी जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर

सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Tractor Theft)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथील चोरी गेलेला ट्रॅक्टर हा ताके यांनी सोलापूर येथे विकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, भगवान थोरात, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली.