Prof. Dnyanesh Kulkarni : पुस्तके माणसाला संवेदनशील बनवितात : प्रा. ज्ञानेश कुलकर्णी

Prof. Dnyanesh Kulkarni : पुस्तके माणसाला संवेदनशील बनवितात : प्रा. ज्ञानेश कुलकर्णी

0
Prof. Dnyanesh Kulkarni : पुस्तके माणसाला संवेदनशील बनवितात : प्रा. ज्ञानेश कुलकर्णी
Prof. Dnyanesh Kulkarni : पुस्तके माणसाला संवेदनशील बनवितात : प्रा. ज्ञानेश कुलकर्णी

Prof. Dnyanesh Kulkarni : नगर : पुस्तके आपल्या आयुष्याची खरी गुरु आहेत. वाचनाची सवय माणसातील आत्मविश्वास वाढवून त्याला संवेदनशील बनविते, असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश कुलकर्णी (Prof. Dnyanesh Kulkarni) यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ (Reading Inspiration Day) साजरा करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, तहसीलदार शरद घोरपडे, साहित्यिक किशोर मरकड, प्रमुख वक्ते प्रा. ज्ञानेश कुलकर्णी आणि शशिकांत नजन उपस्थित होते.

नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर

प्रमुख वक्ते प्रा. कुलकर्णी म्हणाले,

“डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग उजळविला. त्यांच्या आदर्शातून वाचन संस्कृतीचा प्रसार व प्रेरणा देण्यावर आपण भर द्यावा.” साहित्यिक किशोर मरकड म्हणाले, “वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे सर्वात प्रभावी साधन आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून तरुणांनी सतत ज्ञानार्जनाचा ध्यास घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Prof. Dnyanesh Kulkarni)

सूत्रसंचालन तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.