Manikrao Kokate brother: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार

0
Manikrao Kokate brother:क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार
Manikrao Kokate brother:क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार

नगर : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Koakte) हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (Bharatiy janata Party) प्रवेश करणार आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

भारत कोकाटे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, तसेच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले आहे. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.

नक्की वाचा : राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!

पक्षांतराच्या राजकारणात आणखी एक पाऊल (Manikrao Kokate brother)

सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर, भाजपने स्थानिक प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याची रणनीती पुन्हा स्पष्ट केली आहे. भारत कोकाटे यांचा प्रवेश त्याचाच एक भाग मानला जातोय. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिन्नरमध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन  

कोकाटेंच्या कुटुंबातच मतभेद  (Manikrao Kokate brother)

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची राजकीय वारसदार म्हणून त्यांची कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीत त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांच्यासमोर राजकीय अडथळे उभे राहू लागले आहेत. मंत्री कोकाटे यांना यापूर्वीच, विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीत घरातूनच विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या सख्ख्या भावासोबत गेले काही वर्ष त्यांचे मतभेद सुरू आहेत, आणि याचा थेट परिणाम कोकाटे कुटुंबाच्या राजकीय प्रवासावर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी थेट मंत्री कोकाटे यांना आव्हान देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता.तसेच अनेक ठिकाणी मंत्री कोकाटे यांना विरोध केला होता.