Dr. Pankaj Ashiya : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया

Dr. Pankaj Ashiya

0
Dr. Pankaj Ashiya : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
Dr. Pankaj Ashiya : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया

Dr. Pankaj Ashiya : नगर : शेतकऱ्यांनी फुलशेतीत उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा (Scientific Technology) वापर करावा. पाण्याचा कार्यक्षम वापर व कीडनियंत्रणासाठी समन्वित पद्धत अवलंबावी. अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांतून (Experiment) शेतीत उत्पन्नवाढ साधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले.

नक्की वाचा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे फुलशेती, फळशेती व पॉलीहाऊस प्रकल्पांची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेतीतील अडचणी, पिकांवरील प्रादुर्भाव, बाजारपेठेतील विक्रीसंबंधी प्रश्न तसेच हवामानातील बदलामुळे होणारे परिणाम याविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

अवश्य वाचा : पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन (Dr. Pankaj Ashiya)

यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी राजेंद्र देसले व तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके उपस्थित होते. या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आपले अनुभव मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्साहाचे कौतुक करून, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी,” असे आवाहन केले. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ‘ऑरेंज व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ला सदिच्छा भेट दिली. कंपनीच्या कार्यपद्धती, शेतमाल प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्धतेबाबत माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकत्रितपणे कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करून रोजगारनिर्मिती साधण्याचे आवाहन केले.