
नगर : राज्यात तुफान हजेरी लावलेला नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) आता परतीच्या प्रवासावर (Return journey) निघाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (IMD Forecast) पुढील २४ तासांत देशभरातून पाऊस माघारी फिरण्यासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट होते. काल (१५ ऑक्टोबर) मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने तुफान हजेरी लावली.
आजही हवामान विभागाने महाराष्ट्रात कोकण मध्य व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. पुढील दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी होणार असून त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
नक्की वाचा: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार
हवामान खात्याचा अंदाज नेमका काय ? (Maharashtra Weather Update)
राष्ट्रीय मोसमी विज्ञान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, देशभरातून नैऋत्य मौसमी पाऊस परतण्यासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. येत्या २४ तासात देशभरातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज IMD ने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिलाय. एकूण १३ जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
कोणत्या जिल्ह्यांना असेल पावसाचा अलर्ट ? (Maharashtra Weather Update)
१६ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, तळ कोकणासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे .
१७ ऑक्टोबर : पालघर व नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट. मराठवाडा, कोकण ,मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.