Shivajirao Kardile:दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत;शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

0
Shivajirao Kardile: दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत;शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
Shivajirao Kardile: दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत;शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

नगर : भाजप नेत्यांच्या राहणीमानापेक्षा वेगळे टोपी पायजमा घालणारे, ग्रामीण भागाशी घट्ट नाळ असलेले आमदार म्हणून राज्यभर ओळख असलेले आमदार शिवाजीराव कर्डिले(MLA Shivajirao Kardile) यांचे आज (ता. १७) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन (Died of Heart Attack) झाले. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. साधा दूधवाला ते थेट मंत्री, आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली. त्यांचा हाच राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात… 

नक्की वाचा:  राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या

शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास (Shivajirao Kardile)

आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जन्म १९५८ साली झाला. नगर तालुक्यातील पूर्व भागातील बुऱ्हाणनगर येथून शिवाजीराव कर्डिले हे नगर शहरात विक्रीसाठी दूध घेऊन यायचे. तेथे त्यांची विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा त्यांनी बुऱ्हाणनगर व परिसरातील ग्रामस्थांना करून दिला. त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. यातूनच त्यांनी थेट अपक्ष उमेदवार म्हणून १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक लढवत पहिला विजय मिळवला.

अवश्य वाचा: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार  

नंतर १९९९, २००४, २००९ असे तब्बल २५ वर्षे लोकांनी त्यांना आमदार केले. आघाडी सरकारने त्यांना जुलै २००२ ते जुलै २००४ या कालावधीत बंदरे व मत्सव्यवसाय तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या कालावधीत जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पूनर्वसन व मदत कार्य विभागांचे राज्यमंत्री पद दिले होते. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. २००४ मध्ये ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. मात्र, त्यातूनही त्यांनी जनसंपर्क न सोडता राजकारणात जोरदार कमबॅक केला.

सर्वसामान्यांशी नाळ टिकवून ठेवणारा राजकीय नेता हरपला  (Shivajirao Kardile)

२०२४ मध्ये राहुरी मतदार संघातून ते पुन्हा आमदार झाले. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीन वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषविले. बुऱ्हाणनगर मध्ये बाणेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव काम केले होते. जिल्हा सहकारी बँकेतील त्यांच्या कामाचा गौरव देशपातळीवर झाला होता. त्यांच्या जाण्याने मात्र संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एक शिस्तप्रिय, मनमिळावू व सर्वसामान्यांशी नाळ टिकवून ठेवणारा राजकीय नेता म्हणून अहिल्यानगरच्या राजकीय पटलावर त्यांच्या स्मृती चिरकाळ टिकून राहतील.