Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Shirdi : राहाता : श्री साईबाबा संस्थान (Shree Saibaba Sansthan Trust) विश्वस्त व्यवस्था शिर्डी (Shirdi) या देवस्थानातील विद्युत विभागात ७७ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांच्या पाठपुराव्यातून हा नवा घोटाळा उजेडात आला असून उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

याबाबत दाखल फिर्यादीत म्हटलं आहे की,

श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे विद्युत विभाग येथे संस्थान कर्मचारी म्हणून ‘कार्यरत असताना त्यांचे अखत्यारीत व जबाबदारीमध्ये असलेल्या विद्युत साहित्यांची डेड स्टॉक रजिष्टर प्रमाणे नोंदणी न ठेवता विद्युत साहित्याची चोरी केली व डेड स्टॉक रजिष्टरमध्ये बनावट नोंदी केल्या व ज्यावेळी अपहार उघडकीस आला त्यावेळी अतिरिक्त विद्युत साहित्य सदर ठिकाणी जमा केले आहे. याबाबत लेखापरिक्षण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, वरील सर्व आरोपींनी मिळून ७७,१३९२३/- रुपयांची वीज साहित्य चोरी करून त्याचा अपहार केला आहे.

Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
Shirdi : शिर्डी देवस्थानमधील विद्युत विभागातील घोटाळा उघड; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

संजय काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Shirdi)

त्यात सर्व ४७ आरोपींवर स्वतंत्रपणे चोरीच्या साहित्याची रकमेची जबाबदारी नक्की केलेली असून त्यापैकी 39 आरोपींनी त्यांचेवरील जबाबदारीची रक्कम भरणा केली आहे. उर्वरीत 8 यांनी त्यांचेवरील जबाबदारीची रक्कम भरणा केलेली नाही. अशा प्रकारे सर्व आरोपींनी कटाने सदर विद्युत साहित्य चोरी व अपहार केलेला आहे. अशी फिर्याद फिर्यादीने उच्च न्यायालय खंडपीठ येथे दाखल केले होते व त्यात उच्च न्यायालयाने त्यांना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास आदेशीत केल्याने त्यांनी सदर तक्रार दाखल केली असून या प्रकाराने शिर्डी सह साई संस्थान वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनीच सदर घोटाळा बाहेर काढला आहे.