LCB : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनींग साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 

LCB : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनींग साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 

0
LCB : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनींग साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 
LCB : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनींग साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 

LCB : नगर : दिवाळी सणानिमित्त (Diwali Festival) काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाच्या (Rationing Rice) साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) छापा टाकून तब्बल ४५० गोण्या असा ११ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

४५० गोण्या तांदुळ हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किराणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील संदीप सुभाष शिंदे हा भगवान पुंड (रा. करजगांव), हा आजूबाजूचे रेशनिंग दुकानदार यांच्याकडून विनापरवाना रेशनिंगचा तांदुळ खरेदी करुन संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी (ता.जि.छत्रपती संभाजीगनर) येथे विक्री करण्याकरीता गोडावुनमध्ये साठा करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी ४५० गोण्या असा २२ हजार ५०० किलो तांदुळ असा एकूण  ११ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (LCB)

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली.