Fraud : लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश

Fraud : लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश

0
Fraud : लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश
Fraud : लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश

Fraud : कोपरगाव: अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय-प्रोफाइल टोळीचा (High-Profile Gang) कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहेगाव (ता. कोपरगाव) येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या ‘बनावट नवरी’ सोबत लग्न लावून देत या टोळीने त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले. लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे नवरीने पळ काढल्याने, तरुणाला आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी ‘बनावट नवरी’सह पाच आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargaon Taluka Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

पहाटे ‘नवरी’ घरातून पसार

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका अविवाहित तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत एक तरुणी दाखवण्यात आली. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान चर्चा आणि हे लग्न पार पडले आणि तरुणाकडून मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री, पहाटेच्या सुमारास ‘नवरी’ घरातून पसार झाली. सकाळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

बनावट नवरी, तीन पुरुषांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल (Fraud)

दरम्यान, सदर छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी महिला ज्योती राजू गायकवाड ही 16 ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. कोपरगाव तालुका पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने ज्योती राजू गायकवाड हिला ताब्यात घेतले. याच रात्री तिच्यासह, बनावट नवरी आणि तीन पुरुष साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे करीत आहेत. इतर पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here