Pune Shaniwar wada:शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल  

0
Pune Shaniwar wada:शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल  
Pune Shaniwar wada:शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल  

Pune Shaniwar wada : पुण्यातील शनिवारवाड्यात (Shaniwar wada)धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांकडून सामूहिक सामूहिक नमाज पठण (Namaj Pathan) करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल (Viral Video) झाला होता. त्याच्या विरोधात काल (ता. १९) काही संघटनांकडून निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणाची संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. आता याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

नक्की वाचा :  दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास  

नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Pune Shaniwar wada)

शनिवारवाड्यामध्ये काही महिलांनी सामूहिक नमाज पठण केले. त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात निदर्शने केली. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून काल (ता. १९) रात्री तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

अवश्य वाचा:  दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर    
शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र,पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. ज्या ठिकाणी नमाज पठण झाले, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे, असा पवित्रा मेधा कुलकर्णी यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांकडून त्यांना शनिवारवाड्यात जाण्यास मनाई करण्यात आली.

रुपाली ठोबरे यांची मेधा कुलकर्णींवर टीका  (Pune Shaniwar wada)

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा,अशी मागणी केली. पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा,शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाची नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे,अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.