Weather Update: राज्यावर पुन्हा पावसाचे संकट; २० ते २५ ऑक्टोबरला पावसाचा इशारा 

0
Weather Update: राज्यावर पुन्हा पावसाचे संकट; २० ते २५ ऑक्टोबरला पावसाचा इशारा 
Weather Update: राज्यावर पुन्हा पावसाचे संकट; २० ते २५ ऑक्टोबरला पावसाचा इशारा 

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावली आहे. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे. ऐन दिवाळीत ही राज्याच्या अनेक भागात पाऊस (Rain Update) सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने (IMD)आता २०, २१, २२, २३, २४ आणि २५ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.

 नक्की वाचा: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल    

हवामान खात्याचा अंदाज नेमका काय ? (Weather Update)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे संकेत आहेत. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

अवश्य वाचा: संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले;बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान  

२० ते २५ ऑक्टोबरला पाऊस बरसणार  (Weather Update)

२० ते २५ ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. पुढील काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याचे स्पष्ट संकेत भारतीय हवामान विभागाने दिली आहेत. २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगडमध्ये आणि २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत आहेत.