Crime Filed : नगर : माजी आमदार नरेंद्र घुले (Narendra Ghule) यांच्या पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातील शेतजमिनीच्या कंपाऊंडची भिंत तोडून आतमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश (Illegal Entry) करत ‘ताबा’ मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन ते चार अनोळखी महिलांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
कंपाऊंडची भिंत फोडून आतमध्ये अनाधिकाराने प्रवेश
याप्रकरणी नरेंद्र मारूतीराव घुले (वय ६५ रा. दहिगाव ने, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नरेंद्र घुले यांची पोखर्डी शिवारातील गट नंबर १८०/२ मध्ये शेतजमीन आहे. गुरूवारी (ता. १६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना ताबा मारल्याचा प्रकार लक्षात आला. तीन ते चार अनोळखी महिलांनी त्यांच्या जागेच्या कंपाऊंडची भिंत फोडून आतमध्ये अनाधिकाराने प्रवेश केला होता.
अवश्य वाचा : शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल
जागा खाली करण्याबाबत सांगीतले असता शिवीगाळ (Crime Filed)
इतकेच नाही, तर या महिलांनी तेथे दोन पाल ठोकून राहण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, घुले यांचे कर्मचारी करण गुंजाळ व इतरांनी, त्या महिलांना जागा खाली करण्याबाबत हटकले. तेव्हा या अनोळखी महिलांनी वाद घालण्यास सुरूवात केली. शिवीगाळ करत दमदाटी केली. या बाबत नरेंद्र घुले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.