Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

0
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Ajit Pawar : नगर : अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्री स्व. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी त्यांनी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

मंत्री अजित पवार म्हणाले,

“शिवाजीराव कर्डिले हे दांडगा लोकसंपर्क असलेले, जमिनीशी जोडलेले आणि लोकांमध्ये राहणारे खरे लोकनेते होते. काळाच्या पडद्याआड अशा व्यक्तीचे जाणे म्हणजे जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी मोठी हानी आहे. नियतीच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही, परंतु अशा वेळी कुटुंबाला आधार देणे ही आपली जबाबदारी आहे.”

अवश्य वाचा : शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल

मंत्री पदापर्यंतच्या प्रवासात जनतेचा विश्वास संपादन केला (Ajit Pawar)

“माझे कर्डिले यांच्याशी १९९५ सालापासून स्नेहाचे संबंध होते. त्यांनी सरपंच पदापासून ते मंत्री पदापर्यंत प्रवास करत जनतेचा विश्वास संपादन केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला असतानाही, लोकांमध्ये राहणाऱ्या माणसाकडून ते शक्य झाले नाही. त्यांनी लोकसेवेची वाटचाल कधीही थांबवली नाही. त्यांच्या जाण्याने अरुण काकांनंतरची आणखी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघणे अशक्य आहे.”

या वेळी आमदार माधुरी  मिसाळ यांनीही कर्डिले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, आमदार अशितोष काळे आणि आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. लोकसंपर्क, जनसेवा आणि दांडग्या नेतृत्वाचा प्रतीक असलेल्या शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.