Fraud : नगर : औद्योगिक न्यायालयात (Industrial Court) नोकरी करणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) ५० हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
एसबीआय सॅलरी खात्यातून ५० हजार रुपये कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनीत नगर, सिव्हील हडको येथे राहतात. १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५४ च्या सुमारास, त्यांना कोणताही ओटीपी शेअर केलेला नसताना किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक केले नसताना, त्यांच्या एसबीआय सॅलरी खात्यातून ५० हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी तत्काळ सायबर हेल्पलाइनवर तक्रार केली.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
दोन्ही बँक खात्यांच्या धारकांविरुद्ध गुन्हा दाखल (Fraud)
तपासात असे निष्पन्न झाले, ही रक्कम आधी जीओ पेमेंट्स बँक खाते आणि त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया खाते वर ट्रान्सफर झाली. त्याच रात्री आरोपींनी एटीएम व पीओएस मशीनद्वारे हे पैसे काढून घेतले. याप्रकरणी, तोफखाना पोलिसांनी वरील दोन्ही बँक खात्यांच्या धारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.



