Sanjay Vairagar Beating Case : संजय वैरागर मारहाण प्रकरणी आरोपींवर मोका लावा: किसन चव्हाण यांची मागणी

Sanjay Vairagar Beating Case : संजय वैरागर मारहाण प्रकरणी आरोपींवर मोका लावा: किसन चव्हाण यांची मागणी

0
Sanjay Vairagar Beating Case : संजय वैरागर मारहाण प्रकरणी आरोपींवर मोका लावा: किसन चव्हाण यांची मागणी
Sanjay Vairagar Beating Case : संजय वैरागर मारहाण प्रकरणी आरोपींवर मोका लावा: किसन चव्हाण यांची मागणी

Sanjay Vairagar Beating Case : नगर : संजय वैरागर यांना झालेली अमानुष मारहाण (Sanjay Vairagar Beating Case) ही केवळ व्यक्तीगत नाही, तर मातंग समाजावर हल्ला आहे. या घटनेप्रमाणेच शेवगाव तालुक्यातील थाटे गावात ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ ससाणे यांनाही गावगुंडांकडून मारहाण झाली असून, त्या प्रकरणातसुद्धा आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. दोन्ही प्रकरणात पीडित हे मातंग समाजातील असून, आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. आरोपींना तत्काळ अटक करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्हा हा दलित-अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करून वैरागर परिवाराला पोलीस संरक्षण (Police Protection) द्यावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण (Kisan Chavan) यांनी केली आहे.

नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

जिल्हा रुग्णालयात जाऊन संजय वैरागर यांची घेतली भेट

नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर हिंदुत्ववादी काही गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत वैरागर यांचे हात पाय तोडण्यात आले, डोळा फोडण्यात आला, तसेच त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन संजय वैरागर यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते.

अवश्य वाचा : कर्मचारी महिलेला ५० हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

यावेळी उपस्थित (Sanjay Vairagar Assault Case)

यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, शहर महासचिव प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, तसेच संकेत शिंदे, रियाज शेख, विवेक कसबे, मनोज साळवे, सुरेश पानपाटील, शरीफ पठाण, प्रतीक जाधव, प्रतीक ठोकळ, फैरोज पठाण, भारतीय बौद्ध महासभेचे गोरख केदारे, संतोष जाधव, नितीन साळवे, अविनाश राक्षे, सचिन कांबळे, सार्थक आढाव, संजय शिंदे, पिनू भोसले, कुमार बनसोडे, दिनेश पाखरे, अजय पाखरे, श्रीकांत देठे आदी उपस्थित होते.


चव्हाण म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वैरागर कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधून घटनेची माहिती घेतली असून, ते लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याला भेट देणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेट देऊन निवेदन सादर केले असून, दलित, मातंग, मुस्लिम समाजावरील अन्याय विरोधात तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.