Crime Filed : नगर : शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (ता.२३) नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत, चोरट्याने (Thief) दोन वेगवेगळ्या प्रवाशांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी प्रियंका कदम (वय ३२, रा. काष्टी पुनर्वसन, ता. श्रीगोंदा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली (Crime Filed) आहे.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
१५ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण चोरले
कदम या गुरुवारी सकाळी श्रीगोंदा येथून अहिल्यानगरला आल्या होत्या. दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्या भाऊबीजेच्या सणासाठी नाशिक येथे माहेरी जाण्याकरिता माळीवाडा बसस्थानकावरून नगर-नाशिक बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ओढून घेतले.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
आणखी एका प्रवाश्याचीही चोरी (Crime Filed)
कदम यांनी आरडाओरडा करताच त्याच ठिकाणी बसमध्ये चढत असलेले दुसरे प्रवासी गणेश साळी यांच्याही गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन कोणीतरी ओढून नेल्याचे निदर्शनास आले. दागिने चोरीला गेल्याची खात्री पटताच कदम यांनी थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



