Talathi Bharti 2025: राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे 

0
Talathi Bharti 2025: राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे 
Talathi Bharti 2025: राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे 

Talathi Bharti 2025 : शासकीय नोकरी (Government job) म्हणजे तरुणाईसाठी सुवर्णसंधी.एकदा सरकारी नोकरी लागली की, वळून पाहायलाच नको असा बऱ्याच जणांचा समज असतो. आता याच  सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी एक मोठी खुशखबर आहे, कारण महाराष्ट्रात महसूल विभागाने १७०० तलाठी पदांसाठी भरती (Talathi Bharati) प्रक्रिया सुरू केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही माहिती दिली आहे.

 नक्की वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?  

महसूल सेवकांची मागणी नेमकी काय ? (Talathi Bharti 2025)

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तलाठ्यांची पदे रिक्त होती.आता हीच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. २०२३ सालच्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले होते. तसेच, नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदांवरूनही समस्या निर्माण झाली होती. यावर न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे. मात्र, शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिलेत.

अवश्य वाचा:  सिडनीत ‘RO-KO’चा ‘हिट’शो! अखेरच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे  

आता या भरतीत महसूल सेवकांची म्हणजेच कोतवालांची एक प्रमुख मागणी होती की, त्यांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करून मानधन नव्हे तर वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली. त्यात वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभव ग्राह्य धरून अधिक गुण देण्याचा विचार आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही तलाठी भरती होणार आहे. या तलाठी भरतीची अधिकृत अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.

आता या परीक्षेसाठी पात्रता काय असेल ? (Talathi Bharti 2025)

तलाठी पदासाठी उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे असून आरक्षणानुसार उमेदवारांना सवलत मिळेल. आता ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) स्वरूपात होईल, ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश असेल. या भरती बाबतची अधिकृत सूचना mahabhumi.gov.in वेबसाइटवर डिसेंबर २०२५ पर्यंत येण्याची शक्यता आहे.