NCP Office Lavani Dance:अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणीचे घुमले सूर;सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

0
NCP Office Lavani Dance:अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणीचे घुमले सूर;सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
NCP Office Lavani Dance:अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणीचे घुमले सूर;सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP Office)नागपूर (Nagpur) येथील कार्यालयात लावणीचा (Lavani Dance) कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral Video) झाला आहे. त्यात एका महिला कार्यकर्तीला लावणी सादर करताना पाहायला मिळत आहे.आता याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

नक्की वाचा: राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे   

दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणीचे सूर (NCP Office Lavani Dance)

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी ‘दिवाळी मिलन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमादरम्यान पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने दोन गाण्यांवर लावणी सादर केली. कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अवश्य वाचा:  रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?  

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? (NCP Office Lavani Dance)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा व्हिडिओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्या कुटुंबात देखील आम्ही होतो. तुम्ही शरद पवारांकडून अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काढून घेतला. हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. तिथे असे प्रकार करणे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील लावणी कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले असून संबंधित प्रकार हा निषेधार्ह आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल,अशी माहिती त्यांनी दिली आहे.