Yellow Alert : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’; जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन

Yellow Alert : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’; जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन

0

Yellow Alert : नगर : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार बुधवार (ता. २९) या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने (District Administration) अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी (Yellow Alert) करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

धरणांमधून सध्या विसर्ग सुरु (Yellow Alert)

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४ हजार २३४ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३ तीन १५५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ९ हजार ४३२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धारणातून ८२० क्सूसेक, निळवंडे धरणातून ३५० क्यूसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून ३०० क्युसेक, विसापूर धरणातून ३४२ क्यूसेक, सीना धरणातून १ हजार ३० क्युसेक, येडगाव धरणातून विसापूर ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू सोडण्यात आला आहे.