AMC : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

AMC : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

0
AMC : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
AMC : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

AMC : नगर : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची (Releasing Reservation) जाहीर सूचना प्रसिद्ध होऊन ११ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या (AMC) प्रभागनिहाय आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे (AMC)

आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे.

आरक्षण सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबर वृत्तपत्रात प्रसिध्द करणे.

आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबर सादर करणे.

  • प्रारुप आरक्षण हरकती व सूचना १७ नोव्हेंबरपर्यंत विहित नमुन्यात प्रसिध्द करणेप्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत विचार करुन महापालिका आयुक्त यांनी निर्णय घेणे.
  • आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात २ डिसेंबर शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.
  • अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?