Kidnapping : तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Kidnapping : तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

0
Kidnapping : तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Kidnapping : तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Kidnapping : नगर: अहिल्यानगर तालुक्यात भरदिवसा एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण (Kidnapping) केल्याची घटना हातवळण मध्ये शनिवार (ता. २५) रोजी दुपारी घडली. यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांना मारहाण (Baiting) करत शिवीगाळ केली, असल्याचे फिर्यादीत (Complaint) म्हटले आहे.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गणेश काकडे, माऊली पठारे (पूर्ण नाव माहीत नाही), सुनील दिलीप पठारे, अक्षय भंडारी (सर्व रा. बनपिंप्री) हे चौघेजण हातवळण गावातील घरी आले.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करून शिवीगाळ (Kidnapping)

चार जणांनी विचारले तुझा नवरा कोठे आहे. त्याने माझ्याकडून घेतलेले पैसे अजून दिले नाही. त्यावेळी त्यांना सर्व पैसे दिले असल्याचे सांगितल्याने राग आला. त्यांनी सर्वांनी शिवीगाळ करून एकाने हाताला धरून बाहेर ओढले. तसेच नवरा व सासरा यांचे हातपाय काढण्याची धमकी दिली त्यानंतर हातवळण गावातील चौकामध्ये असणाऱ्या सलूनच्या दुकानात पतीस लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दुकानातील साहित्याची तोडफोड करून फेकून दिले. हातवळण ग्रामस्थांच्या समक्ष दुकानातील महापुरुषाच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली. तसेच पती यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चौघांनी पळवून नेले असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.