नगर : सोने आणि चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर याच दरात मोठी घसरण झाली आहे. मागील चोवीस तासात सोन्याच्या (Gold Price) आणि चांदीच्या (Silver Price) दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच सोमवारी (ता. २७) सोन्याचे दर जीएसटी (GST) शिवाय १,२२,५०० इतके असताना त्यात आज ४,३०० रुपयांची घसरण होऊन तेच दर १,१८,२०० रुपये इतक्या खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही सहा हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. चांदी १,५१,००० वरून चांदीचे दर १,४५,००० रुपयावर घसरले आहेत.
नक्की वाचा: लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार? देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे शिफारस
घसरणीमागे काय आहेत कारणे? (Gold Silver Rate )

नफावसुली : सोने आपल्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातूतून मोठ्या प्रमाणावर नफावसुली केली. याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि किंमतीवर झाला.
अमेरिका-चीन तणावात घट: अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ तणाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. भू-राजकीय तणाव कमी झाल्याने ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून सोन्याची मागणी घटते, ज्यामुळे किमतींवर ब्रेक लागतो.
दिवाळी, धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण एक सुवर्णसंधी ठरली आहे.
अवश्य वाचा: रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?



