
Radhakrishna Vikhe Patil : नगर : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) जनतेन ज्यांना हद्दपार केले तेच पुन्हा मोर्चे काढण्याचे खटाटोप करीत आहेत. कितीही दिशाभूल केली तरी राज्यातील जनतेच्या मनात महायुतीचे (Mahayuti) स्थान भक्कम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राहाता तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा
राहाता तालुक्यातील वाकडी साकूरी आणि पुणतांबा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास तुकाराम बेंद्रे बापुसाहेब देशमुख नितीन कापसे डॉ. स्वानंद गाडेकर शोभा घोरपडे आरपीआयचे राजाभाऊ कापसे पप्पू बनसोडे बाळासाहेब गाडेकर डॉ धनंजय धनवटे बाळासाहेब म्हस्के यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
कितीही खटाटोप केला तरी जनता थारा देणार नाही (Radhakrishna Vikhe Patil)
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत ज्यांना जनतेचा विश्वास मिळवता आला नाही ते आता मत चोरीचे आरोप करून सत्याचे मोर्चे काढायला निघाले आहेत. मोर्चे काढून कितीही खटाटोप केला तरी महाविकास आघाडीला जनता थारा देणार नाही.
राज्यात महायुती सरकार चांगले काम करीत आहे. सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद झाली नाही. विरोधक खोट्या वावड्या उठवत असतात पण सरकारची भूमिका समाजाला न्याय देण्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार जनतेसाठी निर्णय घेत आहे. राज्यात अतिवृष्टी झाली तर ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली. केवळ घोषणा नाही तर अमंलबजावणी करणारे महायुती सरकार असून, राहाता तालुक्यातील शेतकर्याना ४० कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. यामध्ये कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. त्याच उत्साहाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करून आपला तालुका महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.
ना.विखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील युवकांच्या रोजगार निर्मितीचे काम आपण हाती घेतले आहे. शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये चांगले उद्योजक येत असून उद्योजक गणेश निबे यांच्या संरक्षण प्रकल्पाची उभारणी सुरू असून फेब्रवारी मध्ये प्रत्यक्ष त्याचे काम सुरू होईल. टाटा गृपने तिनेशे कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर इथे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सेंटरमधून युवकांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी वर्षांत फक्त रोजगार निर्मितीला गती देणे एवढेच आपले उद्दीष्ट असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
निळवंडे धरणाचे पाणी आल्याने लाभक्षेत्रात समाधान आहे. अनेक वर्ष त्या विषयावर भाषण ऐकावी लागली. मात्र महायुती सरकारमुळे पाणी देता आले. आता पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंदीस्त पाइपलाईन पध्दतीची कार्यवाही करण्याचा जलसंपदा विभागाचे धोरण आहे. गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. आगामी काळात चर दूरूस्तीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून सर्व चर अतिक्रमण मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


