Superintendent of Police : नगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर झालेल्या प्राणघातक आणि अमानुष हल्ल्यातील (Deadly Attack) सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का (MCOCA) (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ, मुस्लिम समाज, मातंग समाज आणि ख्रिश्चन समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी उपस्थित
यावेळी सुशांत म्हस्के, अजीम खान, रोहित आव्हाड, संदीप वाघमारे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, संदीप वाघचौरे, दानिश शेख, विशाल भिंगारदिवे, सागर चाबुकस्वार, सिध्दांत कांबळे, सिद्धार्थ भिंगारदिवे, सुजित घंगाळे, हरीश अल्हाट, खालिद शेख, यासर शेख, खलील शेख, सागर चाबुकस्वार, विजय शिरसाठ, शहेबाज हाजी, मोसिन शेख, स्वप्निल साठे, जुनेद शेख, समीर शेख, गणेश साठे, नईम शेख, गुलाम शेख, अमित काळे, अजय पाखरे आदी उपस्थित होते.
तरुणाला उचलून नेऊन निर्दयपणे मारहाण (Superintendent of Police)
सोनई येथे संजय वैरागर या तरुणाला उचलून नेऊन निर्दयपणे मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच अंगावर लघवी करून थुंकणे यांसारख्या अमानुष कृत्यांद्वारे त्याचा छळ करण्यात आला. या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत मातंग, आंबेडकरी, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.



