BJP : जोर्वे गटात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

BJP : जोर्वे गटात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
BJP : जोर्वे गटात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
BJP : जोर्वे गटात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

BJP : संगमनेर : तालुक्यातील वाघापूर गावातील काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने जोर्वे गटात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली आश्वि येथे कार्यकर्ता बैठकीत हा पक्ष प्रवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक तोंडावर असताना हा पक्ष प्रवेश झाल्याने माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. या पक्ष प्रवेशाने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही

यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

संगमनेर सहकारी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापूर गावचे माजी उपसरपंच विनोद घोलप, साहेबराव शिंदे, रामा शिंदे, सयराम राहणे, बाबासाहेब शिंदे, दिपक पानसरे आदींनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्व पदाधिकारी गावातील सोसायटी व पतसंस्थेचे संचालक असल्याने यांचा प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, (BJP)

सर्वसामान्य जनतेच्या विकासाची कामे करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भाजपची ताकद वाढत आहे. आपण देखील त्यांच्या नेतृत्वखाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा झेंडा फडकवणार आहोत. दरम्यान, गोकुळ दिघे यांनी वाघापूर गावच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विखे पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश करून मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी हा डाव रचला आहे. त्यांना जोर्वे गटातून उमेदवारी मिळण्याची चर्चा असल्याने त्यांनी हा मास्टर स्ट्रोक लावला आहे. जोर्वे गटात फक्त भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचे भाजपाचे मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी यावेळी सांगितले.