
नगर : सातारा जिल्ह्यात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) गृहमंत्री पद देणे आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करणे, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
नक्की वाचा: ‘देशातील दोन भ्रष्ट कुटुंबातील युवराज मला २४ तास शिव्या देत असतात’- नरेंद्र मोदी
‘राज्यात पूर्णवेळ गृहमंत्र्यांचा अभाव’ (Pankaja Munde and Sushma Andhare)

यावेळी सचिन खरात म्हणाले, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्णवेळ महिला म्हणून पंकजा मुंडेंना गृहमंत्री पद द्यावं तसेच डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारे या आवाज उठवत आहेत. त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावे, अशी देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
अवश्य वाचा: बच्चू कडू यांचा एल्गार नेमका कशासाठी ? प्रमुख मागण्या कोणत्या ?
‘साताऱ्याचे प्रकरण बीडला द्या’ (Pankaja Munde and Sushma Andhare)
खरात पुढे म्हणाले की, “महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण साताऱ्यात घडलं असलं,तरी या प्रकरणातील गुन्हा बीड जिल्ह्यात चालवावा. यातील ज्या संशयितांचे नाव येत आहे, त्यांची नार्कोटेस्ट केली जावी, असं देखील त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणावरून सचिन खरात यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील थेट निशाणा साधलाय. ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे मोठमोठ्या मारतात, पण या प्रकरणात मोर्चा का काढत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर टीका केली.


