Sujay Vikhe Patil : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्येच होणार : डॉ. विखे पाटील

Sujay Vikhe Patil : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्येच होणार : डॉ. विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्येच होणार : डॉ. विखे पाटील
Sujay Vikhe Patil : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्येच होणार : डॉ. विखे पाटील

Sujay Vikhe Patil : नगर : अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयासाठी (Ahilyanagar District Hospital) जिल्हा नियोजन मधून विविध कामासाठी आत्तापर्यंत तब्बल ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता पुन्हा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी १८ कोटी १५ लाखांचा निधी कार्डियक कॅथ लॅब युनिट (Cardiac Catheterization Laboratory) साठी उपलब्ध केला आहे. याचा आम्ही कुठेही गाजावाजाही केला नाही. विखे पाटील परिवार आणि जगताप पाटील परिवार हे अहिल्यानगर शहराच्या विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचे, प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले आहे. दरम्यान अहिल्यानगर शहरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”

यावेळी उपस्थिती

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात कार्ड युनिट सेंटरचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १) पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, बाबुशेठ टायरवाले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगर, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ.अनिल फुंदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर, गणेश बोरुडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी

माजी खासदार विखे म्हणाले, (Sujay Vikhe Patil)

अहिल्यानगर शहरात ५०० एकर जागेवर आगामी काळात एमआयडीसी उभारली जाणार आहे. तसेच महिलांसाठी येत्या चार-पाच दिवसात महिला प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. जेव्हा मी असे उपक्रम करतो तेव्हा मला नेहमी एका प्रश्न पडतो की, निवडणुकीपूर्वी मी अहिल्यानगर महापालिकेत अद्यावत असे एम आय आर, सिटी स्कन सेंटर, दोन वर्षात आयुष्य रुग्णालय उभारले, कोविड काळात जिल्हा रुग्णालयात आयसीयू उभारले, आज १८ कोटी रुपया खर्च करून गोरगरीब जनतेसाठी कार्डिया कॅथ लॅब युनिट सेंटर उभारले आहे. निवडणूक ही कुठल्या कारणामुळे नाही तर कुठल्या पदासाठी आम्ही केली नाही.

मी खासदार असो अथवा नसो आम्ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागच्या एका वर्षात जितके कामे आम्ही केले तितके कामे त्याच्या दोन टक्के तरी कामे लोकप्रतिनिधींनी केली का? असा सवाल खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता केला आहे. माझा पराभव झाला तरी आम्ही थांबलो नाही. जनतेला अशा लोकांच्या भरवशावर ठेवणे योग्य नाही,आम्ही विकास कामे सुरु ठेवली आहेत. आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य माणूस ओळखायला शिका, असा सल्ला ही त्यांनी दिला.


यावेळी संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय हे गोरगरिबांच्या आस्थेचा प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालय अद्ययावत होत आहे. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावे. यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.