नगर : आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचा चिमटा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari)काढला आहे. महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. ते अकोला (Akola) येथे बोलत होते. मिटकरींनी या मोर्चाला हौशा- गौश्या- नवशांची यात्रा म्हटलं आहे.
नक्की वाचा: आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू
“विजय वडेट्टीवार व रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी” (Amol Mitkari)
अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवार यांच्या बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलल्याचं मिटकरी म्हणालेत. यावरून काही अक्कल नसलेले लोक ‘ट्वीट’ करीत आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करीत असल्याचं ते म्हणालेत. यावरून टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
अवश्य वाचा: राज ठाकरेंचा ‘सत्याचा मोर्चा’ नेमका कशासाठी ?
चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे की महायुतीचे? (Amol Mitkari)
राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे,असं विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांवर अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत दादांची ‘स्लीप ऑफ टंग’ झाली असावी. मात्र, ते महाविकास आघाडीचे आहेत की, महायुतीचे आहेत, हे समजत नसल्याचं ते म्हणालेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा कौल दिल्याचंही ते म्हणालेत. वाढत्या वयामुळे चंद्रकांत दादांकडून अशी वक्तव्य होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.



