नगर : ज्यांची नोट चोरी बंद झाली, त्यांना आता वोट चोरीची आठवण झाली. त्यांना पराभव समोर दिसत आहे. या निवडणुकीत जिंकू शकत नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी ते करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या शनिवार(ता. १) मोर्चाचा समाचार (Criticism) घेतला.
नक्की वाचा: भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
… तर यांनाही उत्तर देता येणार नाही (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मतदार याद्यात चुका नाहीत हे आम्ही कधीच नाकारलेले नाही. आम्हीही अनेकदा त्या चुका, दुबार नावे दाखवून दिली आहेत. प्रश्न आहे की, जे दुबार मतदार आहेत त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे, हे दाखवावे लागेल. आमच्याकडे यांच्या मतदारसंघातील अशी माहिती आहे, जी समोर आणली तर यांनाही उत्तर देता येणार नाही. हे सगळे मतचोरी करून निवडून आले आहेत हे आम्ही लवकरच दाखवू, अशा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.



