नगर : लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana)योजनेतील लाभार्थींसाठी एक आनंदवार्ता आली आहे. ई-केवायसीची (E-KYC) मुदतवाढ याच महिन्यात संपणार आहे. लाभार्थ्यांसाठी ईकेवायसी करणे बंधनकारक(Compulsory) करण्यात आले आहे. मात्र आता लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ईकेवायसी प्रक्रियेत थोडी शिथिलता आणली आहे.
नक्की वाचा: नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
शासनाकडून ‘त्या’ अटीची दखल (Ladki Bahin Yojana)
फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना अटकाव करण्यासाठी या योजनेत ईकेवायसी करण्याचे बंधन केले आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थी महिलांची मोठी अडचण झाली होती. या योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागणार आहे. तरच eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, त्यांची अडचण होत होती. त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर शासनाने त्याची दखल घेतली आहे.
अवश्य वाचा: ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष
अट शिथील, मात्र ईकेवायसी प्रक्रिया करावी लागेल पूर्ण (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत पती अथवा वडीलांचे आधार कार्ड जोडणे, अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण ज्यांचे पती अथवा वडील हयात नाही. त्या लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ईकेवायसी प्रक्रियेत थोडी शिथिलता आणली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यात एक मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. आता याप्रकरणात महिलांना पती अथवा वडील नसेल तर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने या विषयी अपडेट दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.



