Sharad Pawar:”राज्याचा ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही”-शरद पवार 

0
Sharad Pawar:
Sharad Pawar:"राज्याचा ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही"- शरद पवार 

sharad pawar on ashish shelar : राज्याचा एक ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचं नाही,असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आणि मनसेवर दुबार मतदारांवरुन निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी मुस्लिम दुबार मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर टीका (Criticism) केली आहे.

नक्की वाचा:  लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-kyc करण्यासाठी ‘ती’ अट शिथिल  

काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar)

शरद पवार म्हणाले की, “या राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. विशेषतः सरकारमध्ये जे आहे त्यांची जबाबदारी जास्त आहे. जे राज्य सरकारमधील मंत्री आहेत, एक ज्येष्ठ मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवण्यासंबंधी वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही.”

अवश्य वाचा:  मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन  

आशिष शेलारांचा आरोप काय ? (Sharad Pawar)

मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदानावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी आरोपांचं रान उठवलं आहे. याच मुद्द्याला धरून सत्ताधारी भाजपही आता मैदानात उतरलं आहे. कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषेदत लाव रे तो व्हिडीओ म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

दुबार मतदारांच्या मुद्द्यावर मनसे आणि महाविकास आघाडीची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप शेलारांनी केला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का, मुस्लिम दुबार मतदाराबद्दल तुमची भूमिका वेगळी आहे. हा वोट जिहाद आहे, असा आरोपही शेलारांनी केला. यासोबतच शेलारांनी कर्जत-जामखेड, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी मतदारसंघातील दुबार मतदारांवरूनही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.