Kalbhairavnath Temple Agadgaon : भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून आगडगावला सप्ताह

Kalbhairavnath Temple Agadgaon : भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून आगडगावला सप्ताह

0
Kalbhairavnath Temple Agadgaon : भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून आगडगावला सप्ताह
Kalbhairavnath Temple Agadgaon : भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून आगडगावला सप्ताह

Kalbhairavnath Temple Agadgaon : नगर : काळ भैरवनाथ (Kalbhairavnath Temple Agadgaon) जन्मोत्सवानिमित्त आगडगाव (Agadgaon) येथील देवस्थानाजवळ गुरुवारपासून (ता. ६) हरिणाम सप्ताह (Akhand Harinam Saptah) व काशिखंड पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कीर्तनास आलेल्या सर्व भाविकांना रोज महाप्रसाद

काळ भैरवनाथ जन्मोत्सव १२ नोव्हेंबरला आहे. त्यानिमित्त दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यानुसार ता. ६ ते १३ नोव्हेंबरदरम्यान सप्ताहात कीर्तनसेवा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारपासून रोज सायंकाळी सात वाजता अनुक्रमे ईश्वर कदम, पोपट कासारखेड, श्रीनिवास घुगे, गितांजली झेंडे, गंगाधर खैरे, लक्ष्मण कदम, हरिदास पालवे, संतोष कौठाळे आदी महाराजांची कीर्तनसेवा होईल. रोज काकडा भजन, काशिखंड पारायण, हरिपाठ, कीर्तन, भजन असे कार्यक्रम होतील. कीर्तनास आलेल्या सर्व भाविकांना रोज महाप्रसाद दिला जाईल. जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम १२ तारखेस होईल. या दिवशी रात्री १२ वाजता गंगाजलाने अभिषेक, जन्मोत्सव असे कार्यक्रम होतील.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने (Kalbhairavnath Temple Agadgaon)

या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, भैरवनाथ देवस्थानाजवळ प्रत्येक रविवारी कीर्तन महोत्सवांतर्गत सायंकाळी सात वाजता कीर्तन सेवा होते. जानेवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत. तसेच या वर्षी झालेल्या जोगेश्वरी सप्ताहांतर्गत अनेक भाविकांनी सेवेचा लाभ घेतला. जन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहातील उपक्रमांस हजारो भाविक सहभागी होतील. सर्वांची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.