
नगर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर (Voting dates announced) करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आज 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू (Code of Conduct Enforcement) करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare)यांनी ही घोषणा केली.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-kyc करण्यासाठी ‘ती’ अट शिथिल
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
अवश्य वाचा: “राज्याचा ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही”-शरद पवार
कसं असेल निवडणुकीचे वेळापत्रक ? (Maharashtra Local Body Elections)
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
एकूण मतदारांची संख्या किती ? (Maharashtra Local Body Elections)

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
उमेदवारांसाठी खर्चात वाढ
यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही,असे डिक्लरेशन घेतलं जाईल.


