Election : नगरपालिका, नगरपंचायतीचा वाजला बिगुल; २ डिसेंबरला होणार मतदान

Election : नगरपालिका, नगरपंचायतीचा वाजला बिगुल; २ डिसेंबरला होणार मतदान

0
Election : नगरपालिका, नगरपंचायतीचा वाजला बिगुल; २ डिसेंबरला होणार मतदान
Election : नगरपालिका, नगरपंचायतीचा वाजला बिगुल; २ डिसेंबरला होणार मतदान

Election : नगर : नगरपालिका (Municipality) व नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीचा (Election) बिगुल वाजला असून २ डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज (ता. ४) सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयुक्त (Election Commissioner) दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

२४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

या निवडणुकीत २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीतून २८८ अध्यक्ष २४६ नगरपालिकांमध्ये १० नवीन नगरपालिका आहेत. तर ४२ नगरपंचायतींमध्ये १५ नवीन नगरपंचायतीं आहेत.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

निवडणूक आयुक्त म्हणाले की, (Election)

या निवडणुकीतून २८८ नगराध्यक्ष निवडले जाणार असून, ६ हजार ८५९ सदस्य निवडले जाणार आहेत . यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर १ कोटी ७ लाख इतके मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार असून, १३ हजार ३५५ मतदान केंद्र असणार आहेत. तसेच ही निवडणूक ईव्हीएमवरच होणार असून, नगरपंचायतीमध्ये एक सदस्य वार्ड असतील, असे वाघमारे यांनी म्हटले. तर मतदान २ डिसेंबरला होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.