Leopard : सुगाव बुद्रुक येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Leopard : सुगाव बुद्रुक येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

0
Leopard : सुगाव बुद्रुक येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
Leopard : सुगाव बुद्रुक येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Leopard : अकोले : तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील दीपक महाराज देशमुख यांच्या निवासस्थानाजवळील शेतात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद (Leopard trapped in cage) झाला आहे. पिंजर्‍याला घेतलेल्या धडकेत हा बिबट्या (Leopard) जखमी झाला आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पाळीव प्राण्यांवर बिबट्याने केले होते हल्ले

सुगाव बुद्रुक व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले होते. भरदिवसाही बिबट्याचे अनेकांना दर्शन होत असल्यामुळे शेतकरी शेतात जीव मुठीत धरून जात होते. या भागात तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळकरी मुले, नागरिकांत बिबट्यांची दहशत होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ देशमुख यांनी तालुक्यातील बिबट्यांचे हल्ले व त्यात अबालवृद्धांचे झालेले मृत्यू ही बाब लक्षात घेता वन अधिकार्‍यांशी संपर्क साधला. तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

बिबट्या पकडला तरी भीतीचे वातावरण कायम (Leopard)

आठवडाभरापूर्वी दीपक महाराज देशमुख यांच्या निवासस्थानाजवळील शेतात पिंजरा लावण्यात आला होता. याशिवाय अन्य दोन ठिकाणीही पिंजरे लावण्यात आले. दोन बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले. मंगळवारी पहाटे पिंजर्‍यात जेरबंद झालेला बिबट्या हा अंदाजे 3  वर्षे वयाचा व नर जातीचा आहे. बिबट्याने पिंजर्‍याला धडका घेतल्यामुळे त्याच्या तोंडाला काही प्रमाणात जखमा झाल्या आहेत. बिबट्या पकडण्यासाठी वनरक्षक रोहिदास परते, अस्वले, ऋषीकेश देशमुख, सिद्धांत देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर बिबट्याची येथीलच वन विभागाच्या रोपवाटिकेत रवानगी करण्यात आली. तेथेच त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. बिबट्या पकडला असला तरी शेतकर्‍यांमधील भीतीचे वातावरण कायम आहे.