
Bar Council : नगर : जिल्हा न्यायालयाच्या (District Court) जुन्या इमारतीशी सर्व वकिलांचे ऋणानुबंध जुळले आहेत. या इमारतीत आल्यावर एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. अशा चांगल्या इमारतीत आता अधिवक्ता परिषद (Bar Council) न्याय केंद्राचे कार्यालयाल सुरु झाले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गरजूंना चांगले कायदेशीर सहकार्य मिळेल. या कार्यालयास जिल्हा सरकारी वकील म्हणून सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील (Satish Patil) यांनी दिले.
अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अहिल्यानगर जिल्हा न्याय केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन
जुन्या न्यायालयामध्ये अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा न्याय केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी केंद्रीय कार्यकारणी सदस्या ॲड.अर्पिता झरकर, विभाग प्रमुख ॲड.सुधीर भागवत, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ॲड. युवराज पोटे, महामंत्री ॲड.विनोद गायकवाड, उपाध्यक्ष ॲड.सुनील सुर्यवंशी व ॲड.पृथ्वी डापसे, सहमहामंत्री ॲड.विकास सांगळे, कार्यालय प्रमुख ॲड. कौस्तुभ कुलकर्णी, कोषाध्यक्ष ॲड.अमीत झरकर, न्याय केंद्र प्रमुख ॲड.विनायक सांगळे, न्याय प्रवाह प्रमुख ॲड.योगेश दहातोंडे आदींसह वकील वर्ग उपस्थित होता.
नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
यावेळी ॲड.युवराज पोटे म्हणाले, (Bar Council)
अहिल्यानगर मध्ये अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे काम सुरु झाले आहे. सर्वसामन्यांना चांगला न्याय मिळावा यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन, सहकार्य यामाध्यमातून करणार आहोत. या कार्यालयाचा जास्तीत जास्त लाभ सर्व गरजू पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात न्याय केंद्र प्रमुख ॲड.विनायक सांगळे म्हणाले, न्याय सर्वांसाठी ही राज्य घटनेची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अखिल भारतीय अभिवक्ता परिषदेचे काम सुरु आहे. प्रत्येक गरजू नागरिकास कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे. तसेच गरीब, असहाय्य नागरिक व महिलांना, कामगार, बालके यांना न्यायाच्या प्रवाहात आणण्याचे काम येथून होत आहे. या कार्यक्रमास डॉ. गिरीश कुलकर्णी, अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके, ॲड.सी. डी. कुलकर्णी, ॲड.विजय महाजन ॲड.शिवाजी सांगळे, ॲड. लक्ष्मण कचरे, ॲड.सुरेश लगड, ॲड. पी. डी. शहाणे, ॲड.दीपक धीवर, ॲड.अमोल डोंगरे, ॲड.संतोष कांडेकर ॲड.अभिषेक पगारिया, ॲड.सुधीर बाफना आदी उपस्थित होते.


