Stray Dogs : नगर : केडगाव उपनगरात सध्या मोकाट कुत्र्यांचा (Stray Dogs) उच्छाद मांडला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे कुत्रे नागरिकांच्या मागे धावणे, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना घाबरवणे, लहान मुलांच्या अंगावर झेप घेणे, तसेच रात्री सतत भुंकने यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुमित संजय लोंढे यांनी महापालिका (AMC) आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांची भेट घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना
केडगाव उपनगरात अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यांवरील कचऱ्यात हे कुत्रे घोटाळून तो पसरवतात, त्यामुळे अस्वच्छता वाढते. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
कारवाई केली नाही, तर कुत्रे थेट महापालिकेत सोडणार (Stray Dogs)
महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीही काही प्रमाणात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असले तरी ते अपुरे ठरले आहे. शहर व उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे अनियंत्रित व्यवस्थापन यामुळे मोकाट कुत्र्यांची वाढ होत असल्याचेही लोंढे यांनी निदर्शनास आणून दिले. जर महापालिकेने तातडीने या संदर्भात कारवाई केली नाही, तर आम्ही संबंधित कुत्रे थेट महापालिका कार्यालयात आणून सोडणार आहोत. प्रशासनाने जबाबदारी टाळू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. केडगाव उपनगर, रेल्वे स्टेशन परिसर, दूधसागर, इंदिरा नगर, हनुमान नगर, मोहिनी नगर, कांबळे मळा, कायनेटिक चौक या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांची निर्बिजीकरण करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.



