Suicide : नगर: सारसनगर येथील एका व्यावसायिकाने विषारी औषध (Poison) प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक कोटी रूपयांच्या कर्जाचे व्याजासह परतफेड (Loan Repayment) करूनही, अधिक पैशासाठी तगादा लावणाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मयुर रंगनाथ खंडके (वय ४२, रा. समर्थ बंगला, त्रिमुर्ती चौक, सारसनगर, अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
प्रवीण अनिल सुंबे (रा. महात्मा फुले चौक, सारसनगर) व पंकज राजु भोसले ऊर्फ सोनु शेठ (रा. भोसले आखाडा, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी पुष्पा खंडके (वय ४०) यांनी रविवारी (ता. २) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
मयुर यांच्याकडे लावला होता तगादा (Suicide)
मयुर खंडके यांनी प्रवीण सुंबे व पंकज भोसले यांच्याकडून एक कोटी रूपये कर्ज घेतले होते. ही रक्कम मयुर यांनी व्याजासह परत केली होती. असे असतानाही, दोन्ही संशयित आरोपींनी व्याजापोटी आणखी रक्कमेची मागणी करत मयुर यांच्याकडे तगादा लावला होता. या जाचाला व छळाला मयुर कंटाळले होते. याच नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी (ता. १) रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयुर यांची पत्नी पुष्पा यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करीत आहेत.



